प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति)

विपश्यना साधनेच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले आभारी आहोत. आमच्या संस्थेसाठी आपली गोपनीयता महत्वपूर्ण आहे. आपल्या गोपनीयतेला चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला आमची माहिती पध्दत व गोष्टींबद्दल माहित असले पाहिजे की कशा प्रकारे आपली माहिती संग्रहित केली जाते आणि त्याचा उपयोग या साईटवर तसेच सामान्यपणे जगभरांतील आमच्या संलग्न संस्था कशा प्रकारे त्याचा उपयोग करतात हे आपल्याला अवगत असले पाहिजे. कृपया हे लक्षांत घ्या की विश्वभरातील आमच्या संलग्न संस्थेच्या गोपनीयता नीतिचे तपशील भिन्न देशामध्ये भिन्न असू शकतात. आपल्या माहितीची गोपनीयता नीति त्या स्थानी काय आहे ते जाणण्यासाठी विपश्यना शिबीर रजिस्ट्रार किंवा विपश्यना शिबीर स्थानी आल्यानंतर गोपनीय नीतिची मूळ प्रत पहायला मिळू शकेल.

आम्ही ही माहिती एकत्र करतो

जर आपण कोणत्याही विपश्यना शिबीरासाठी ऑनलाईन अथवा आवेदन पत्र भरुन नाव नोंदविल्यास आपली व्यक्तिगत ओळख दर्शविणारी सर्व प्रकारची माहिती जमा केली जाते त्यामध्ये नांव, पत्ता, ईमेल पत्ता, दुरध्वनी क्रमांक, फॅक्स नंबर, तसेच आवेदन पत्रांत आणि शिबीर नोंदणी नमून्यात मागविलेली इतर अतिशय व्यक्तिगत माहिती असते. आपली शिबीर आवेदन पत्रांतील व शिबीर नोंदणी नमुन्यातील व्यक्तिगत माहिती आमच्याकडील सुविधेनुसार सुरक्षितरित्या साठविली जाते आणि ज्याना विशिष्ट माहिती जाणुन घ्यायची आहे अशानाच, जसे की शिबीर रजिस्ट्रार, केन्द्र/शिबीर व्यवस्थापक आणि ज्या शिबीराला तुम्ही प्रवेश मागितला आहे त्या शिबीराचे संचालन करणाऱ्या सहाय्यक आचार्यानाच दिली जाते.

जर तुम्हाला आमच्या “ विपश्यनेबद्दल मित्राला सांगणे”(“Tell A Friend About Vipassana”) ह्या सेवेचा वापर करायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक भेटकार्ड व आमच्या वेब साईटचा पत्ता त्याला पाठवण्यासाठी तुमचा आणि त्या व्यक्तिचा ईमेल पत्ता तुम्ही देणे आवश्यक आहे. त्या सेवेकडून जमा करण्यात आलेल्या आपल्या सर्व प्रकारच्या व्यक्तिगत ओळखीबद्दलच्या महितीमध्ये आपला ईमेल पत्ता असेल आणि ह्या पानावर जमा करण्यात आलेल्या दुसऱ्या लोकांची सर्व प्रकारच्या व्यक्तिगत ओळखीबद्दलच्या महितीमध्ये ती सेवा घेणाऱ्या व्यक्तीचा ईमेल पत्ता अंतर्भूत असणार आहे. जेव्हा तुम्ही आमची वेबसाईट पेज पहाल तेव्हा आम्ही अव्यक्तिगत ओळखीची माहिती सुध्दा घेऊ जसे की तुम्ही कोणत्या प्रकारचा ब्राऊजर वापरत आहात ( फायरफॉक्स, नेटस्केप, ऑपेरा किंवा इंटरनेट एक्स्प्लोरर वगैरे ), कोणत्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा तुम्ही वापर करीत आहात ( विन्डोज, मँक ओएस किंवा लिनक्स ) आणि तुमच्या क्षेत्रांत इंटरनेट सर्विस देणाऱ्याचे नाव ( जसे अमेरिका ऑनलाइन, अर्थलिंक ).

आपली माहिती आम्ही कशी वापरतो.

आपल्या आवेदन पत्रांतील आणि नोंदणी पत्रकांतून तुम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग आम्ही आपल्या आवेदन पत्राच्या मुल्यांकनाव्दारे त्या शिबीराच्या प्रवेश आणि नोंदणीसाठी करतो. शिवाय जे आपल्या आयुष्यात वारंवार नंतरच्या विपश्यना शिबीरे हजर राहिले आहेत अशा लोकांचा शोध घेऊ शकतो. पुढील शिबीरांच्या प्रवेश सुलभिकरणासाठी आणि साधकाचा पुर्वेतिहास व अनुभवाची नोंद ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक साधकाचा शिबीर तक्ता, असे करण्यास जर त्या भागांत कायदेशीर मनाई नसल्यास किंवा साधकाने त्याने/तिने नोंद नष्ट करण्यास सांगितले नसल्यास अमर्यादित काळापर्यंत ठेऊ. काही बाबतीत आम्ही आपले नाव पत्ता आणि/किंवा इमेल पत्त्याचा उपयोग आपली मनाई नसल्यास विपश्यना संबंधित कामकाज व सोयीसुवीधेची माहिती पाठविण्यासाठी करु. तुम्ही दुसऱ्याबद्दल आमच्या “ Tell a Friend “ सेवेव्दारे दिलेल्या महितीचा उपयोग त्यांना तुमचे भेटकार्ड आणि आमचा वेबसाइटचा पत्ता पाठविणे शक्य होईल. काही वेळेस आम्ही अव्यक्तिगत ओळखीच्या माहितीचा उपयोग आमच्या साईटची रुपरेखा व परिमाण सुधारण्यासाठी करु जेणेकरुन आम्हाला समजेल की कोणत्या स्थानातून आमच्या साईटचा व साईट अंतर्भूत कोणत्या फाईलचा वापर केला जातो. म्हणजेच ह्या माहितीचा उपयोग साईट वापराच्या विश्लेषणासाठी एकत्रित करु. ह्या विपश्यना वेबसाईटवरील आपल्या व्यक्तिगत ओळखीची महिती कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिला, व्यापारीकरणासाठी किंवा कोणत्याही कारणासठी उपलब्ध नसेल. परंतू आमच्या संस्थेच्या विभागिय वेबसाईट क्रेडीट कार्ड आधारित देणग्या स्विकारतील आणि त्या वेळेस त्या देणगीच्या आर्थिक व्यवहार संबंधीत व्यक्तिगत माहिती नेहमीच्या प्रक्रियेनुसार होईल. या व्यतिरिक्त, आमच्या संलग्नीत संघटना व त्यांच्या रचने अंतर्गत सोयीखेरीज आपली व्यक्तिगत माहिती इतराना प्रगट करीत नाही. अपवादात्मक परिस्थितीत कायदा अंतर्गत आवश्यकता जसे की कोर्टाचा हुकूम किंवा समन्स असल्यास दिली जाऊ शकते. कायदा अंमलबजावणी एजन्सीच्या विनंतीनुसार किंवा इतर कायद्याच्या गरजेनुसार आम्हाला ही माहिती प्रगट करावी लागेल.

आपले शिबीर आवेदन पत्र व पंजीकरण नमुन्यात दिलेली आपली माहिती विपश्यनेचे सर्व आचार्य आणि सहाय्यक आचार्य तसेच साधनाकेंन्द्रातील कर्मचारी आणि धम्मसेवक यांनाच “जेव्हढी महिती हवी” तेव्हढीच उपलब्ध असेल. एकदा ही माहिती केंन्द्र किंवा अस्थायी केंन्द्राच्या रजिस्ट्रारला ज्या शिबीरासाठी दिली असेल तेथे प्रकटीकरणापासून किंवा तिसऱ्या व्यक्तिच्या शिरकावापासून दूर अशी विश्वासपूर्वक व सूरक्षित ठेवली जाते. तथापी ज्या विशिष्ट शिबीरासाठी आपण नांव नोंदविले आहे त्या देशांतील व्यवहारिक गोपनियता कायद्यातील पध्दतीनुसार आपली माहिती सांभाळली, साठवली व वापरली जाईल. जेव्हा आपण उघडपणे ईंटरनेटव्दारे इमेल मधून आवेदन पत्र दिल्यास असावधपणे आपली माहिती प्रकट होण्याचा धोका असतो. जर हा धोका पत्करायचा नसेल तर ह्या वेबसाइटवरील इमेल आवेदन पत्राचा उपयोग कृपया करु नका.

आमचे आवेदन पत्र आणि त्यात दिलेली व्यक्तिगत माहिती संगणकात साठविली व हाताळली जाते. त्या खेरीज आमचे संगणक जगांतील वेगवेगळ्या देशांत स्थापित केले आहेत. आमच्या एकाद्या शिबीरासाठी आपण दिलेले आवेदन पत्र म्हणजे आपली आवेदन पत्रातील माहिती संगणकात साठविण्यासाठी आणि हाताळण्यासाठी व आपली आवेदन पत्रातील व्यक्तिगत माहिती दुसऱ्या क्षेत्रात स्थलांतरीत करण्यासाठी एकाअर्थी आपल्या अनुमतीचाच भाग असतो. साधकाच्या कल्याणासाठी स्वास्थाशी संबंधीत बाबीची किंवा शिबीरातील अनुशासन संहितेशी विसंगत वर्तणुक किंवा साधकाला भविष्यातील शिबीरात भाग घेण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी किंवा भविष्यातील शिबीरासाठी अधिक आधाराच्या गरजेसाठी या गोष्टींची नोंद करण्याची आवश्यकता आम्हाला असेल. काही दुर्लभ घटनामध्ये असे आढळल्यास ह्याची नोंद संगणकावर केली जाईल आणि सहाय्यक आचार्य व भविष्यातील शिबीराशी संबंधीत परवानगीधारक शिबीर रजिस्ट्रार यांच्या बरोबर विश्वासाने विभागली जाईल. आपला शिबीरातील सहभाग म्हणजेच एकाअर्थी अशा नोंदीचा वापर आणि दुसऱ्या क्षेत्रात स्थलांतर करण्याच्या अनुमतीचा भाग असेल.

तिसऱ्या व्यक्ति स्थानाकडून मागविली जाणारी माहिती

ही गोपनियता नीति फक्त आपल्याकडून जमा केलेल्या माहितीचा वापर व प्रसारासाठी आहे. आमची वेबसाईट दुसऱ्या साईटशी जोडलेली असू शकते ज्यामध्ये आमच्या माहिती पध्दतीपेक्षा वेगळी पध्दत असू शकते. अभ्यागतानी दुसऱ्या साईटच्या गोपनियता नीतिच्या सुचनेबद्दल सल्ला घ्यावा कारण तिसऱ्या पक्षाकडून जमा होणाऱ्या किंवा दिल्या जाणाऱ्या माहितीवर आमचे नियंत्रण नसते. आमच्या विपश्यना संघटनेचे तिसऱ्या पक्षाच्या गोपनियता नीतिवर नियंत्रण नसल्यामुळे आपण त्या तिसऱ्या पक्षाच्या गोपनियता रुढी व धोरणाच्या आधिन होऊ शकता. त्या तिसऱ्या पक्षाने आपल्या व्यक्तिगत माहितीचा उपयोग व प्रसार केल्यास आमची विपश्यना संघटना जबाबदार नसेल. म्हणूनच दुसऱ्याला आपली व्यक्तिगत माहिती देण्याअगोदर आम्ही आपल्याला प्रश्न विचारण्यास उत्तेजन देतो.

कूकीज ( Cookies )

विपश्यना वेबसाइटमध्ये असे कुठलेही वेबपेज नाही की ज्यात “ कूकीज “चा वापर केला आहे. कूकीज ह्या टेक्स्ट फाईल तुमच्या संगणकाच्या ब्राऊजर मध्ये तुमच्या पसंतीसाठी साठविलेल्या असतात. काही स्थानिक विपश्यना वेबसाइटनी कूकीजचा वापर केला असू असेल.

मुलांची प्रायवसी (गोपनियता)

आमच्या विपश्यना संस्था सहसा मुलांची माहिती जमा करत नाहीत. परंतू मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्यावर इंटरनेटच्या होणाऱ्या प्रभावाबद्दल आम्हाला माहिती हवी. म्हणूनच यु.एस.चिल्ड्रेन्स ऑनलाइन प्रायवसी पॉलिसी प्रोटेक्शन एक्ट १९९८ नुसार आम्ही जाणुनबुजून १३ वर्षाखालील मुलांची व्यक्तिगत ओळखीची माहिती त्यांच्या पालकाच्या सहमतीशिवाय घेत नाही. जर अशी माहिती पालकांच्या अनुमतीशिवाय घेतली आहे असे निदर्शनास आले तर ती माहिती त्वरीत आमच्या डेटाबेसमधून काढून टाकू.

प्रदेशांची विशिष्ट गोपनिय आवश्यकता

एकाद्या प्रदेशाला विशिष्ट गोपनियता कायद्याची आवश्यकता असू शकते याची कृपया नोंद घ्यावी. विश्वभरांतील आमच्या विपश्यना संघटनानी ह्या आवश्यकता असलेली विशिष्ट गोपनिय धोरणे विकसित केली आहेत ज्यामध्ये विशिष्ट तपशिलामध्ये वर वर्णन केलेल्या सर्वसाधारण धोरणापासून फरक असू शकतो. विशिष्ट आवश्यकतेची प्रत तुम्ही ज्या शिबीरासाठी आवेदन पत्र दिले आहे त्या ठिकाणी तुम्ही शिबीरस्थानी आल्यानंतर त्या शिबीर स्थानाच्या रजिस्ट्रारशी संपर्क करुन घेऊ शकता.

ऑप्ट-आउट/ ऑप्ट-इन

आम्ही आपल्याला “ ऑप्ट-आउट” ची संधी देतो ज्यामुळे आमच्या विपश्यना संघटना आपल्याला इमेल किंवा पत्राव्दारे आमच्या सेवेबद्दल किंवा विपश्यने संबंधीत इतर माहिती मिळते. दुसऱ्या बाबतीत आपल्याला “ऑप्ट-इन” करुन काही स्थानिक माहिती याद्या मिळू शकतील. जर आपल्याला आपले नांव, इमेल पत्ता किंवा दुसऱ्या व्यक्तिगत ओळखीची माहिती आमच्या डेटाबेस मधून काढण्याची निवड करण्यासाठी आपण * database-remove@dhamma.org * या पत्त्यावर इमेल पाठवू शकता. आपण आपल्या स्थानिक विपश्यना केन्द्र किंवा संघटनेशी संपर्क साधून सुध्दा ही माहिती काढून टाकण्याची विनंती करु शकता.

आमच्याशी कसे संपर्क साधाल

जर आपल्याला काही प्रश्न किंवा गोपनियते बद्दल शंका किंवा विपश्यना वेबसाइटच्या धोरणाबद्दल किंवा त्याच्या अंमलबजावणी बाबत काळजी वाटल्यास आपण *webmaster@dhamma.org* या साइटवर संपर्क साधू शकता.

अस्तित्वाची तारिख

ही गोपनियता निती १ नोव्हेंबर २००१ पासून अस्तित्वांत आहे. आमची विपश्यना संघटना ह्या नितीच्या अटींचे कुठल्याही क्षणी आणि आमच्या विचारानुसार फेरफार करण्याचे अधिकार राखून ठेवत आहे. ह्या वेबसाइटचा आपण करीत असलेला उपयोग म्हणजे वरील उल्लेख केलेल्या नितीला आपण स्विकारले असे अंगभूत आहे.