विपश्यना
सत्यनारायण गोयन्का द्वारा जशी शिकविली जाते
साधना
सयाजी ऊ बा खिन च्या परंपरेत
गोएंकाजी कडून धम्माचे शब्द
धम्ममार्गावरील प्रिय यात्री
सुखी राहा!
धम्माची मशाल प्रज्वलित राहो. ही आपल्या दैनिक जीवनामध्ये चमकत राहो. धम्म म्हणजे पलायन नाही.
ही जीवन जगण्याची एक कला आहेः शांती व सद्भावाने स्वतः आणि इतर अन्य सर्व लोकांबरोबर राहाण्याची.
म्हणूनच, एक धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न करा.
रोज सकाळी व संध्याकाळी आपली दैनिक साधना सोडू नका.
जेव्हा वेळ असेल, तेव्हा अन्य विपश्यना साधकांबरोबर साप्ताहिक सामुहिक साधनेमध्ये भाग घ्या.
प्रत्येक वर्षी एक दहा दिवसीय शिबीर करा. हे आपल्यास मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
सर्व विश्वासाने, आपण आजूबाजूच्या काट्याना बहादुरीने आणि हसत हसत सामोरे जा.
घृणा आणि द्वेष, दुर्भावना आणि वैर ह्यांचा त्याग करा.
, प्रेम आणि करुणा उत्पन्न करा, विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांना धम्म समजत नाही आणि म्हणून एक दुखी जीवन जगत आहेत.
आपल्या धम्म व्यवहारामुळे त्यांना शांति आणि सौहार्दाचा मार्ग दाखवा. आपल्या चेहऱ्यावरील धम्म तेज ह्या मार्गावर येण्यासाठी अधिकात अधिक दुःखी लोकांना खऱ्या सुखासाठी आकर्षित करो.
सर्व प्राणी सुखी, शांतिपूर्ण, मुक्त होवोत.
माझ्या सर्व मैत्री सहित.
एस एन गोयनका
