स्वागत

विपश्यना, म्हणजे जे जसे आहे, तसे त्याच्याकडे पाहणे, ही भारतातल्या प्राचीन ध्यान प्रणालींपैकी एक आहे. सुमारे २५०० वर्षांपेक्षाही अधिक पूर्वी सार्वजनिन दुःखांवर एक सार्वजनिन उपाय अर्थात जीवन जगण्याची कला म्हणून ती सुचवली जात होती. जे विपश्यना ध्यान प्रणालीशी परिचित नाहीत, त्यांच्यासाठी श्री गोयेन्काजींनी दिलेला विपश्यना साधनेचा परिचय व्हिडियोस्वरूपात आणि प्रश्न आणि उत्तरे स्वरूपात उपलब्ध आहे.

शिबीरे

विपश्यना दहा दिवसांच्या निवासी शिबीरामध्ये शिकविली जाते. शिबीरार्थीला दहा दिवसामध्ये साधनेची रुपरेषा समजते तसेच साधनेच्या चांगल्या परिणामाचा अनुभव येण्याइतपत तो अभ्यास करु शकतो. शिबीरांसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही, निवासस्थान तसेच खाण्याचे देखील नाही. शिबीरांचा पूर्ण खर्च अशा साधकांच्या दानावर चालतो की ज्यांना लाभ झाल्यामुळे येणाऱ्या साधकांना लाभ व्हावा ही सदभावना असते.

स्थळे

शिबारांचे संचालन असंख्य विपश्यना केंद्रांवर तसेच भाड्याने घेतलेल्या अस्थायी जागेवर केले जाते. प्रत्येक जागी आपआपले स्वतंत्र शिबीर कार्यक्रम होतात. बहुतांश बाबतीत, ह्या वेबसाइटद्वारे ह्या शिबिराच्या प्रवेश अनुमतीसाठी ऑनलाइन आवेदनपत्र पूर्ण करुन केले जाऊ शकते.  येथे भारत तसेच एशिया/पेसिफिक मध्ये; उत्तर अमेरिका मध्ये ; लेटिन अमेरिका मध्ये ; यूरोप मध्ये ; ऑस्ट्रेलिया तसेच न्यूज़ीलेंड मध्ये ; मध्यपूर्व मध्ये तसेच आफ्रिका मध्ये तसेच विश्वभरामध्ये पुष्कळशी विपश्यना केंद्रेआहेत. पुष्कळदा दहा दिवसांची शिबीरे स्थायी केंद्राबाहेर काही जागेवर स्थानिक साधकांव्दारे आयोजित केली जातात. ह्या जगभरांतील शिबीरांसाठी अल्फाबेटीकल सूचि तसेच शिबीर स्थानांचा ग्राफिकल इंटरफेस विश्व एवं भारत तसेच नेपाल साठी सुध्दा उपलब्ध आहे.

विशेष शिबिर आणि संसाधने

तुरुंगात मध्ये सुध्दा विपश्यना शिकविली जाते. एक्झिक्युटिव्ह तसेच शासकीय अधिकाऱ्यांसाठी १० दिवसीय विशेष कोर्स जगभरातल्या विविध केंद्रांमध्ये आयोजित केला जातो. त्याबाबतची माहिती मिळण्यासाठी Executive Course Website. इथे क्लिक करा. विपश्यना साधनेबद्दलची माहिती खाली दिलेल्या अन्य भाषेमध्येसुद्धा उपलब्ध आहे. भाषा निवडीसाठी पानावरील उजव्या कोपऱ्यावरील ग्लोब वर क्लिक करा.